dr.satish best web design developer for mac

तनवडी ग्रामपंचायत :

महाराष्ट्रा मधील कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये सामानगड किल्याच्या पायथ्याशी निसर्ग रम्य सौंदर्यात वसलेले एक लहानसे खेडे म्हणजे तनवडी हे आमचं गाव. आमच्या गावच्या ग्रामपंचायतची स्थापना 1981 साली झाली. गावात एकूण 182 कुटुंबे वास्तव्यास असून गावाची एकूण लोकसंख्या 826 आहे. ती 3 वार्डामध्ये विभागली गेली असून एकूण ग्रामपंचायत सदस्य 7 आहे. गावामध्ये पिण्याचे पाणी विहिरी, बोरवेलच्या माध्यमातून उपलब्ध होते. तर शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधले असून गावात स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंड्या बसवल्या आहेत. गावातील लोकानी निर्मल ग्रामविकासासाठी चांगले सहकार्य केले आहे. गावातील जेष्ठ नागरीक, पंचायत समीतीचे अधिकारी तसेच ग्रामसेवक यानी निर्मलग्रामसाठी पुढाकार घेतला आहे. गाव तंटामुक्त आहे.


ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 1981 साली झाली. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर 7 सदस्यांची गावातील नागरिकांनी एकमताने नेमणूक केली आहे. यांच्यामार्फत गावाचा कारभार, विकास, गावातील लोकांच्या समस्यांची सोडवणूक, गावात शासनाच्या येणाऱ्या योजना राबविणे आदी ग्रामविकासाची कार्ये केली जातात.

सरपंच
सौ. कल्पना गुराप्पा पाटील

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री.बाबासो सिद्धाप्पा पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. परशुराम पांडुरंग रावण

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Tanavadi Grampanchayat
A/p - Tanavadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416551

CONTACTS
Phone :

Office : 02327– 200245